1,287 नागरिकांना विषाणूची लागण
वुहान : चीनमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. दरम्यान, आतापर्यंत 41 जणांचा या विषाणूमुळे मृत्यू झाला आहे. तर 1,287 नागरिकांना या विषाणूची लागण झाल्याचे निदान झाल्याचे सांगण्यात येत आहे. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने शनिवारी जाहीर केले की, शुक्रवारी रात्रीपर्यंत 1,287 लोकांना या विषाणूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यापैकी 237 लोकांची प्रकृती चिंताजनक आहे.
चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने पुढे असे सांगितले की, न्यूमोनियासारख्या विषाणूंमुळे आतापर्यंत एकूण 41 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये चीनच्या हुबेई प्रांतात सर्वाधिक 39 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर आणखी एकाचा मृत्यू उत्तरपूर्व प्रांताताली हिलोंगजियांग येथे झाला आहे. तर चीनमध्ये1,965 संशयित रुण आढळले आहेत.
चीनमध्ये परसरलेला हा जीवघेण्या विषाणू हळूहळू इतर देशांमध्ये देखील पसरण्यास सुरुवात झाली आहे. भारत, थायलंड, हॉंगकॉंग, मकाऊ, तैवान, नेपाळ, जपान, सिंगापूर, दक्षिण कोरिया, व्हिएतनाम आणि अमेरिकेते देखील हा विषाणू पसरला आहे. या विषाणूमुळे भारताची चिंता वाढली आहे. कारण 700 भारतीय विद्यार्थी वुहान आणि हुबेई प्रांतातील विद्यापीठांमध्ये शिक्षण घेत आहेत आणि अजूनही ते तिथेच अडकले आहेत. त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी भारतीय दूतावासाने हॉटलाईन स्थापित केल्या आहेत.
वेगाने पसरत असलेल्या कोरोना विषाणूंचा सामना करण्यासाठी चीनने वुहानमध्ये एक हजार खाटांचे रूग्णालय उभारण्यास सुरूवात केली आहे. 10 दिवसांपेक्षा कमी वेळात हे रुग्णालय तयार होण्याची शक्यता आहे. वुहान आणि हुबेई प्रांतातील 12 इतर शहरांमध्येही त्यांनी उपचारांसाठी सैन्य डॉक्टर तैनात करण्यास सुरवात केली आहे. वुहान आणि हुबेई मधील सर्व सार्वजनिक रहदारी पूर्णपणे बंद करण्यात आल्या आहेत.