नांदेड : काही दिवसांपूर्वी ग्रीन झोनमध्ये असणाऱ्या नांदेड शहरात कोरोनाबाधितांची संख्या शंभरी पार झाली आहे. त्यातच शहरात आतापर्यंत ११६ कोरोनाबाधितांची संख्या पोहचली आहे.
शहरात बाधित रुग्णांच्या संख्येतील सहा जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. तर दोघे फरार झाले आहेत. दरम्यान, ४१ जणांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर लोहारगल्ली आठवा कँटेट मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. तसेच नगिणाघाट परिसरातील आणखी एक मजूर बाधित रुग्ण आढळून आला आहे.