मुंबई – चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार व बेस्ट फिनिशर महेंद्रसिंह धोनी हा फलंदाजीला जाण्यापूर्वी कित्येक सामन्यांत आपली बॅट खाताना चाहत्यांना दिसला आहे. मात्र, त्याला ही कसली सवय आहे. ते मात्र, कधीही उघड झाले नव्हते.
रविवारी दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यातही हेच चित्र दिसले. त्यावेळी त्याचा चेन्नईचा माजी सहकारी खेळाडू अमित मिश्राने त्याचा खुलासा केला आहे. बॅट साफ करणे, त्याच्या गटिंगचे धागे निघाले असले तर ते काढणे धोनीची सवय आहे, त्यामुळेच तो बॅट खातोय असे वाटते, असे मिश्राने सांगितले.
डगआऊट किंवा ड्रेसिंग रूममध्ये तो अनेकदा त्याची बॅट चावताना दिसला आहे. धोनीने दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात त्याने 8 चेंडूत 21 धावांची नाबाद खेळी केली. चेन्नईने हा सामना 91 धावांनी जिंकला मात्र, चर्चा धोनीच्या कृतीचीच जास्त झाली.