मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणने “छपाक’ या आगामी सिनेमाचे गेल्या काही दिवसांपूर्वी शुटिंग सुरू केले आहे. मेघना गुलजारच्या दिग्दर्शनाखालील हा सिनेमा पूर्ण व्हायला खूप वेळ लागण्याची शक्यता आहे.
या सिनेमात दीपिका ऍसिड हल्ल्यातील पीडीत मुलीचा रोल करते आहे. दीपिका नेहमीच सोशल मीडियावर या ना त्या कारणावरून चर्चेत असते.
काही दिवसांपूर्वी ती या चित्रपटातील तिचा लुक हटके चर्चेत होती तर आता दीपिका कोणत्या गोष्टीच्या आधारावर सिनेमात साईन करते. या मुद्यावरून चर्चेत आली आहे.
View this post on Instagram
दीपिका आपल्या चित्रपट साईन करण्यात बाबत वृत्तवाहिनीला मुलाखत देतांना म्हणाली की, ‘मी आजही सिनेमा 10 वर्षांपूर्वीच्या नियमाप्रमाणे निवडते. मी सिनेमा निवडताना माझ्या मनाचे ऐकते. मी तेच सिनेमे करते जे माझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेरचे म्हणजे आव्हानात्मक भूमिका असल्यास तरच सिनेमा साईन करते. तसेच सिनेमाची कथा ऐकून मी जर एक्सायडेट झाली तरच सिनेमा साईन करते.’
दरम्यान, तिच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाल्यास,”छपाक’ , ‘८३’ तसे महाभारतावर चित्रपटामध्ये द्रौपदीची भूमिका साकारताना दिसणार आहे.