मुंबई – दीपिका पादुकोणने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील आपल्या सर्व पोस्ट डिलीट केल्या आहेत. आपल्या या कृतीने तिने नवीन वर्षात आपल्या सर्व फॅनला आश्चर्याचा धक्का दिला आहे. 31 डिसेंबरच्या सर्व ट्विट आणि इंस्टाग्राम वरील फोटो तिने काढुन टाकले आहेत. त्यामुळे आता तिच्या अकाउंटवर कोणतीही नवीन पोस्ट अथवा ट्विट नाही.
दीपिकाचे सोशल मीडिया अकाउंट हॅक झाले असावे असे सगळ्यांना वाटले. मात्र दीपिकाने स्वतः आपला डिस्प्ले इमेज बदलला असल्याचे सगळ्यांना लक्षात आले. दीपिकाने असे का केले असावे, हे मात्र समजू शकलेले नाही. सध्याच्या घडीला ट्विटरवर दीपिकाच्या फॉलोवर्सची संख्या 2.77 कोटी आहे.
तर इंस्टाग्रामवर 5.25 कोटी फॉलोअर आहेत. दीपिका सध्या रणवीर सिंह सोबत राजस्थानमध्ये सुट्टी एन्जॉय करते आहे. रणवीर सोबतच “83”या सिनेमातही ती दिसणार आहे. त्याशिवाय शकुन पत्राच्या आगामी सिनेमातही ती असणार आहे. त्यामध्ये तिच्यासोबत सिद्धांत चतुर्वेदी आणि अनन्या पांडे देखील असणार आहेत. या सिनेमाचे शीर्षक अद्याप ठरलेले नाही.