मुंबई – मेगा स्टार अमिताभ बच्चन सोशल मीडियावर खूपच ऍक्टिव्ह असतात, हे सगळ्यांनाच माहिती आहे. बच्चन यांनी अलीकडेच शुटिंग करताना आतापर्यंतचा सर्वात मोठा त्रास काय होता, हे एका पोस्टमध्ये संगितले आहे.
View this post on Instagram
एका जाहिरातीसाठी त्यांना हातात रसगुल्ला आणि गुलाबजाम घेऊन डायलॉग म्हणायचे होते. त्याप्रमाणे दोन्ही हातात त्यांनी रसगुल्ला आणि गुलाबजाम घेतले आणि डायलॉगही म्हटले.
View this post on Instagram
मात्र, आपण गोड खाणे सोडून दिलेले असतानाच आपल्या हातात रसगुल्ले आणि गुलाबजाम देण्यात आले. त्यातही हे गोड पदार्थ खाल्ल्याच्या आविर्भावात आपल्याला अभिनय करायचा होता. यापेक्षा मोठा त्रास काही असू शकतो का, असे बच्चन यांनी म्हटले आहे.
View this post on Instagram
बच्चन यांच्या पोस्टला एक लाखापेक्षा अधिक लाईक मिळाले आहेत. बच्चन 78 वर्षांचे आहेत, पण अजूनही त्यांची काम करण्याची एनर्जी तरुणांना लाजवेल अशी आहे. त्यांनी स्वतःचा डाएट आणि व्यायाम व्यवस्थित जपला आहे. त्यांचा फिटनेस कमालीचा आहे.
View this post on Instagram
अयान मुखर्जीच्या “ब्रह्मास्त्र’मध्ये बच्चन दिसणार आहेत. त्यामध्ये त्यांच्या बरोबर रणबीर कपूर आणि अलिया भट देखील असणार आहेत. याशिवाय नागराज मंजुळेच्या “झुंड’ आणि रुमी जाफरीच्या “चेहरे’मध्येही अमिताभ बच्चन दिसणार आहेत.
View this post on Instagram