म्हणूनं…सोनिया गांधींच्या रॅलीत दोन रंगांचे झेंडे

रायबरेली – काँग्रेसचा प्रमुख बालेकिल्ला रायबरेली मतदारसंघ. याच मतदारसंघातून आज,काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी उमेदवारी अर्ज भरला. सोनिया गांधींनी जोरदार रोड शो करत अर्ज दाखल करण्यासाठी पोहोचल्या. दरम्यान, यावेळी दोन वेगवेगळ्या रंगाचे झेंडे फडकताना दिसले. यामध्ये एक निळ्या रंगाचा करत दुसरा झेंडा काळ्या रंगाचा होता.

या दोन रंगांच्या झेंड्यांबाबत अनेकांना उत्सुकता होती. याबाबत काँग्रेस कार्यकर्त्यांना विचारण्यात आले. त्यावेळी त्यांनी सांगितले, निळ्या रंगाचा झेंडा काँग्रेसच्या ‘न्याय’ योजनेचा आहे. तर, दुसरा काळ्या रंगाचा झेंडा ‘राफेल’ विरोधात आवाज उठवण्यासाठी आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.