पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला भेट देणार आहेत. पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी तयारी सुरू झाल्याचं सांगितलं आहे. मात्र आता पंतप्रधानांच्या दौऱ्यात बदल झाला असून दुपारी चार वाजता इन्स्टिट्यूटला भेट देणार आहे.
यातच पंतप्रधान मोदी यांचा पुणे दौऱ्यावर काही दिवसांपूर्वी सुप्रिया सुळे दिली होती ,’पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राज्य सरकारचं कौतुक करण्यासाठी पुण्यात येत आहेत, असं त्या म्हणाल्या होत्या. त्यांच्या या विधानावरून भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलतांना त्यांच्यावर टीका केली आहे. ” तर मग आता त्या स्वप्नात आहेत का?, ” अशी अप्रत्यक्ष टीका पाटील यांनी केली.
दरम्यानं, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारला आज वर्षपूर्ण झालं आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारवर भाजप नेते हल्लाबोल करत आहे. या पार्श्वभूमीवर पाटील यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर टीका केली आहे .
काय म्हणाले चंद्रकांत पाटील
“राज्य सरकार अपयशी ठरले आहे. गोंधळलेले आहे. सरकारमध्ये समन्वय नाही. आरक्षण असो, वा आणखी काही कुठल्याच विषयाबाबत हे सरकार खात्री देत नाही.”