…म्हणून अमित शहा महाराष्ट्रात हस्तक्षेप करत नाही – संजय राऊत 

मुंबई –  सध्या राज्यात सत्तास्थापनेवरून रणसंग्राम सुरु आहे. महाराष्ट्रातील जनतेने महायुतीच्या पारड्यात स्पष्ट बहुमत टाकून देखील भाजप-शिवसेना अद्याप सत्ता स्थापन करू शकले नाहीत. शिवसेनेला मुख्यमंत्रीपद आणि भाजपचा नकार यावर युतीची सर्व गणिते अडून बसली आहेत. अशावेळी भाजपचे चाणक्य समजले जाणारे अमित शहा यांनीही सत्ताकोंडी फोडण्यासाठी कोणतीही मध्यस्थी केलेली नाही. यावरून खासदार संजय राऊत यांनी अमित शहांबद्दल मोठे वक्तव्य केले आहे.

संजय राऊत म्हणाले कि, महाराष्ट्रात काळजीवाहू सरकार राहू नये, कायमस्वरुपी स्थिर सरकार यावं त्यासाठी प्रमुख राजकीय पक्षांना वाटत असेल तर त्यादृष्टीने हालचाली कराव्या लागतील. ही वेळ ज्यांनी आणली आहे त्यांना महाराष्ट्राला उत्तर द्यावं लागेल. अमित शहांसमोर या सगळ्या गोष्टी ठरल्या होत्या, म्हणून ते हस्तक्षेप करत नाही, असेही त्यांनी सांगितले आहे.

दरम्यान, शाह हे ट्रबलशूटर आहेत. भाजपला कोणत्याही राज्यांमध्ये बहुमताचा आकडा सिद्ध करण्यात अडचणी आल्या तेव्हा सत्तास्थापनेसाठी शहा यांची राजकीय खेळी भाजपसाठी नेहमीच तारणहार ठरली आहे. त्यामुळे आपणही त्यांचे हे कसब पाहण्यासाठी उत्सुक असल्याचे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)