म्हणून अजित पवार यंदा वाढदिवस साजरा करणार नाही; कार्यकर्त्यांना केले ‘हे’ आवाहन….

मुंबई  – राज्यातील करोना साथीच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचा येत्या गुरुवारी दि. 22 जुलै रोजी येणारा आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. यांदर्भातील एक पोस्ट सुद्धा पवार यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे.

कार्यकर्ते, हितचिंतकांनी माझ्या वाढदिवसानिमित्त कोणत्याही प्रकारचे जाहीर कार्यक्रम आयोजित करु नयेत, गर्दी जमवू नये, प्रत्यक्ष भेटीसाठी येणे टाळावे, असे विनम्र आवाहन यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे.

 काय म्हणाले अजित पवार आपल्या पोस्ट मध्ये….

राज्यातील कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर मी माझा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. कार्यकर्ते आणि हितचिंतकांनी माझ्या वाढदिवसानिमित्त कोणत्याही प्रकारचे जाहीर कार्यक्रम आयोजित करु नयेत, गर्दी जमवू नये, प्रत्यक्ष भेटीसाठी येणे टाळावं, पुष्पगुच्छ पाठवू नयेत. वाढदिवसाच्या शुभेच्छा दूरध्वनीवरुन किंवा डिजिटल स्वरुपात व्यक्त कराव्यात.

सर्वांनी कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करुन महाराष्ट्राला कोरोनामुक्त करण्याच्या लढाईत योगदान द्यावं, असं आवाहन करतो. कार्यकर्ते व हितचिंतकांनी गर्दी जमवणारे कार्यक्रम

आयोजित न करता त्यासाठी खर्च होणारा निधी मुख्यमंत्री सहायता निधीसारख्या कोविडविरोधी लढ्यासाठी द्यावा. मान्यताप्राप्त यंत्रणांच्या सहकार्यानं, कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करुन रक्तदान शिबिरांसारखे लोकोपयोगी कार्यक्रम आयोजित करावेत.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.