मुंबई – जगभरात करोनामुळे लाखो कोटींचे नुकसान झाल्याच्या बातम्या येत असताना बॉलीवूड अभिनेता आमीर खान करोनाचा फायदा घेण्याच्या मूड मध्ये असल्याचे सांगितले जात आहे.
बॉलीवूडलाईफ डॉट कॉम वरील माहितीनुसार आमीरच्या आगामी लालसिंग चढ्ढा मध्ये भारत व चीन यांच्यात लडाखमध्ये सीमेवरून तणाव आहे. याच कारणावरुन आमिर खानने लाल सिंग चड्ढाचे लडाखमध्ये होणारे शूटिंग रद्द केले आहे. या सिनेमातील एका भागाचे शूटिंग लडाढमध्ये होणार होते. भारत-चीनमधील लडाढमधील वाढता तणाव बघून आमिरने शूटिंग करण्यास नकार दिला आहे.