बॉलिवुड अभिनेता विकी कौशल हा त्याच्या चित्रपटासह कतरिना कैफसोबत असलेल्या कथित रिलेशनशिपमुळे चर्चेत होता. या वर्षी प्रदर्शित झालेल्या “उरी ः द सर्जिकल स्ट्राइक’ या त्याच्या चित्रपटाला प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच धम्माल उडविली होती. त्यानंतर आता विकी आपल्या आगामी “सरदार उधम सिंह’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. विकी कौशलने नुकताच एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोत विकी बर्फात मस्ती करताना दिसत आहे.
View this post on Instagram
Witnessed snowfall for the very first time in my life! #OnSet #SardarUdham
या फोटोसोबत विकीने लिहिले की, मी माझा आयुष्यातील पहिली बर्फवृष्टी अनुभवत आहे. ती पण सरदार उधम सिंहच्या सेटवर. या फोटोत विकीचा चेहरा स्पष्टपणे दिसत नाही. तरी त्याचे चाहते लाखोंच्या संख्येने त्यावर पोस्ट लिहित आहेत. दरम्यान, राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता विकी कौशल हा या चित्रपटात स्वतंत्रता सेनानी शहीद सरदार उधम सिंह यांची भूमिका साकार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शूजित सरकार करत आहे. या चित्रपटाशिवाय विकी कौशल “भूत पार्ट वन ः द हॉन्टेड शिप’ आणि “तख्त’ चित्रपटात काम करत आहे.