आपुलकी, पुणे तर्फे वाहतूक विभाग, पोलीस, अग्निशामक दल यांना नाश्ता आणि खाद्य पदार्थाचे वाटप करण्यात आले. खरंतर या संकट काळी जे देवा प्रमाणे धावून येतात ते म्हणजे आपले प्रशासकीय अधिकारी वर्ग जे आपली काळजी करण्याकरिता रस्त्यावर उतरतात अश्यांसाठी मदतीसाठी योग्य ती काळजी घेत खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न आम्ही केला.
सिंहगड रोड वरील चेक पोस्ट, नाका बंदी, स्पॉट वरील पोलीस बांधव आणि वाहतूक पोलीस तसेच अग्निशामक दल तसेच मुख्य सन सिटी पोलीस स्टेशन येथे नाष्टा आणि खाद्य पदार्थाचे वाटप करणयात आले.
यावेळी समीर रुपदे, लक्ष्मीनारायण मालपाणी, चेतन कुलकर्णी यांनी पुढाकार घेतला यावेळी सिंहगड रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री नंदकिशोर शेळके आणि कर्मचारी वर्ग तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सिंहगड भागाचे संघचालक संजयजी बापट आणि विठ्ठलवाडी नगराचे कार्यवाह अभिजीतजी पारगावकर उपस्थित होते.तसेच श्री मालपाणी आणि शारदा फूड्स चे राठी कुटुंबीय यांचे मोलाचे सहकार्य लाभले.