आठ लाख 82 हजार वीजग्राहकांना “एसएमएस’ सेवा

सातारा – महावितरणकडे ग्राहक क्रमांकासोबत मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेल्या बारामती परिमंडलातील 23 लाख 51 हजार वीजग्राहकांना वीजपुरवठा, वीजबिलांसह इतर माहितीचा तपशील “एसएमएस’द्वारे देण्यात येत आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील आठ लाख 82 हजार 446 वीजग्राहकांचा समावेश आहे.

महावितरणकडून वीजग्राहकांना वेळोवेळी ‘एसएमएस’द्वारे माहिती उपलब्ध करून देण्यात येत आहे. यामध्ये पूर्वनियोजित देखभाल व दुरुस्तीसाठी वीजपुरवठा बंद राहणार असल्याचा कालावधी, नैसर्गिक आपत्ती, तांत्रिक बिघाड किंवा विविध कारणांमुळे वीजपुरवठा खंडित झाल्यास त्याची व वीजपुरवठा पूर्ववत होण्याचा संभाव्य कालावधी, बिलाची रक्कम, देय दिनांक आदींचा तपशील, दरमहा वीजबिलाचा व वीजबिल भरण्याच्या मुदतीचा तपशील, मीटर रिडींग घेण्याची तारीख व कालावधी, मीटर रिडींग घेतल्याची तारीख व एकूण युनिटचा वापर, वीजबिलाची मुदत उलटून गेल्यास त्यासंबंधीची माहिती, वीजपुरवठा खंडित करण्याची नियमाप्रमाणे नोटीस आदींची माहिती निशुल्क देण्यात येत आहे. यासोबतच महावितरणच्या वीजबिल भरणा केंद्रात “एसएमएस’ दाखवून वीजबिलाचा भरणा करण्याची सोय उपलब्ध झालेली आहे. तसेच वीजग्राहकांच्या मागणीनुसार मराठी भाषेतून सुद्धा ‘एसएमएस’ उपलब्ध आहे.

सातारा जिल्ह्यात सर्व वर्गवारीतील नऊ लाख 34 हजार 435 पैकी आठ लाख 82 हजार 446 वीजग्राहकांनी मोबाईल क्रमांकाची नोंदणी केली आहे. यामध्ये कऱ्हाड विभाग- दोन लाख 42 हजार 719, फलटण- एक लाख 51 हजार 978, सातारा- दोन लाख 39 हजार 50, वडूज- एक लाख 34 हजार 448 आणि वाई विभागातील एक लाख 14 हजार 251 वीजग्राहकांचा समावेश आहे. महावितरणच्या 9225592255 या क्रमांकावर ‘एसएमएस’द्वारे मोबाईल क्रमांकाची नोंदणी करण्याची सोय असून ग्राहकांनी या मोबाईल क्रमांकावर चठए(स्पेस)(बारा अंकी ग्राहक क्रमांक) अशी माहिती टाईप करून ‘एसएमएस’ केल्यास मोबाईल क्रमांकाची नोंदणी होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here