नवी दिल्ली – गेल्या आठवड्यात राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा कन्याकुमारी येथून सुरू झाली. यावेळी राहुल यांच्याकडून स्वामी विवेकानंद यांच्या स्मारकाकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी कॉंग्रेसवर केला होता. त्यांचा हा दावा खोडून काढणारे अनेक व्हिडिओ कॉंग्रेस नेत्यांनी व्हायरल केल्यामुळे स्मृती इराणींच्या या खोटेपणाचा पर्दाफाश झाला आहे.
तसेच कॉंग्रेस नेते जयराम रमेश यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. गोष्टी स्पष्ट दिसण्यासाठी इराणी यांना वेगळ्या चष्म्याची गरज आहे. तसा जर त्यांच्याकडे नसेल तो देण्याची आमची तयारी असल्याचे रमेश यांनी म्हटले आहे. दरम्यान, कॉंग्रेसच्या अन्य नेत्यांनी एक क्लिप जारी केली आहे. त्यात राहुल गांधी स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला अभिवादन करताना दिसून येत आहेत.
केन्द्रीय मंत्री स्मृति ईरानी ने झूठा बयान दिया।
7 सितंबर को राहुल गांधी भारत जोड़ों यात्रा शुरू करने से पहले कन्याकुमारी के स्वामी विवेकानंद मैमोरियल गये थे। pic.twitter.com/6lxBfyCZyQ— Aadesh Rawal (@AadeshRawal) September 12, 2022
काय म्हटले होते इराणींनी?
भारत एकजूट करण्यासाठी यात्रा सुरू करणाऱ्या कॉंग्रेस पक्षाला मी एक प्रश्न विचारते. स्वामी विवेकानंद यांच्याकडेच दुर्लक्ष करण्याचा निर्लज्जपणा त्यांनी करू नये. असे दिसतेय की विवेकानंद यांचा सन्मान करणे राहुल गांधी यांना मान्य नसावे.
7 तारीख़ को राहुल गांधी जी 3 बजे कहां थे, किस स्मारक में थे, इसका जवाब स्मृति ईरानी को देना चाहिए; अगर उन्हें नया चश्मा चाहिए तो मैं चश्मा देने को भी तैयार हूं: श्री @Jairam_Ramesh #BharatJodoYatra 🇮🇳 pic.twitter.com/zl4nXPqsKt
— Congress (@INCIndia) September 12, 2022