अमेठी – उत्तर प्रदेशमधील अमेठीमध्ये शनिवारी रात्री खासदार स्मृती ईराणी यांच्या माजी सचिवाची हत्या गोळी झाडून हत्या करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जामो पोलीस ठाण्याच्या परिसरात बरौलिया गावात सुरेंद्र सिंह यांची अज्ञात लोकांनी गोळ्या झाडून हत्या केली.
Amethi: Surendra Singh, former village head of Baraulia village under Jamo police station limits, was shot dead by unidentified assailants at his residence, last night. More details awaited. pic.twitter.com/Z40mUXmPUw
— ANI UP (@ANINewsUP) May 26, 2019
लोकसभा निवडणुकीच्या आधीपासूनच अमेठी मतदारसंघ चर्चेत होता. यंदाच्या लोकसभा निवडणुकीचा निकाल तीनच दिवासांपूर्वी लागला होता. यावेळी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा आपल्या पारंपरिक मतदार संघ असलेल्या अमेठी येथून पराभव झाला असून येथून भाजपच्या उमेदवार स्मृती इराणी यांनी विजय संपादित केला आहे. स्मृती इराणी यांच्या विजयामुळे तो पुन्हा चर्चेत आला. आता निकालानंतर सिंह यांच्या हत्येमुळे खळबळ उडाली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुरेंद्र सिंह घराबाहेर झोपले होते. तेव्हा अज्ञात व्यक्तींनी गोळी झाडून हत्या करण्यात आली. या हल्ल्यात जखमी झालेल्या सिंह यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. प्राथमिक उपचार करुन डॉक्टरांनी त्यांना लखनऊ येथील रुग्णालयात नेण्यास सांगितले. लखनऊला घेऊन जाताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर बारौलिया गावात खळबळ उडाली आहे. या घटनेचे वृत्त कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांशी चर्चा करुन हल्लेखोरांना शोधण्यासाठी पोलीस छापे टाकत आहेत.