स्मृती इराणींच्या निकटवर्तीयाची अमेठीत हत्या; इराणींनी घेतली पीडित कुटुंबाची भेट

अमेठी – अमेठी जिल्ह्यातील बरौली गावच्या माजी सरपंचाची काल रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास दोन अज्ञातांनी गोळ्या घालून हत्या केली होती. हत्या करण्यात आलेले सुरेंद्र सिंघ हे भाजपच्या अमेठीच्या खासदार स्मृती इराणी यांचे निकटवर्तीय असून काँग्रेसचा गड मानल्या जाणाऱ्या अमेठीतून स्मृती इराणींचा विजय होऊन दोन दिवस देखील उलटले नसताना सुरेंद्र सिंघ यांची हत्या झाल्याने ही हत्या राजकीय हेतून तर प्रेरित नाही ना? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

याच पार्शवभूमीवर आज स्मृती इराणी यांनी मृत सुरेंद्र सिंघ यांच्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे. या भेटीबाबत माध्यमांशी संवाद साधताना स्मृती इराणी यांनी सांगितले की, “मी आज सुरेंद्र सिंघ यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्याचं आश्वासन दिलं आहे. सुरेंद्र सिंघ यांची हत्या करणाऱ्यांना आणि त्यांच्या हत्या करण्याचा आदेश देणाऱ्यांना आम्ही न्यायालयात खेचू.”

दरम्यान, स्मृती इराणी यांनी भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना मृत सुरेंद्र सिंघ यांच्या पत्नीने या भेटीबाबत माहिती देताना सांगितले की, “स्मृती इराणी यांनी आम्हाला आमच्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी घेण्याचा शब्द दिला आहे. त्यांनी आमच्या मुलांचा सांभाळ आपल्या मुलांप्रमाणे करण्याचं आणि आम्हाला सुरक्षा पुरवण्याचं देखील वचन दिलं आहे. माझे पती सुरेंद्र सिंघ हे राजकीय लढाई लढत होते त्यांनी दीदींना (स्मृती इराणी) निवडून येण्यात मदत केली होती. इथं आसपास खुपसारे काँग्रेस कार्यकर्ते आहेत.”

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×