मुंबई – जेव्हा अभिनेत्री स्मृती इराणी टीव्हीवर तुलसीच्या भूमिकेत दिसली, तेव्हा सगळेच तिचे चाहते झाले. एकता कपूरचा ‘क्योंकी सास भी कभी बहू थी’ हा शो यशस्वी झाला, आणि या शोने स्मृती इराणींना देशाची तुलसी ही पदवी दिली.
या शोमध्ये स्मृती इराणी यांनी लोकांच्या मनावर छाप सोडली. पण स्मृती यांचा प्रवास अजिबात सोपा नव्हता. मेहनत करून त्यांनी यश संपादन केले आहे. आता स्मृती या केंद्रीय मंत्री आहेत.
स्मृती इराणी यांनी एका ताज्या मुलाखतीत आपल्या संघर्षाच्या दिवसांबाबत सांगितले आहे. त्यांच्या संघर्षाच्या काळात त्यांनी मुंबईतील मॅकडोनाल्डच्या आउटलेटमध्ये क्लिनर म्हणूनही काम केले, ज्यासाठी त्यांना महिन्याला 1500 रुपये मिळायचे.
वृत्तवहिनीला दिलेल्या मुलाखतीत स्मृती इराणीने सांगितले की, ‘जेव्हा त्यांची मिस इंडियासाठी निवड झाली, तेव्हा स्मृती यांना सौंदर्य स्पर्धेत सहभागी होण्यासाठी एक लाख रुपयांची गरज होती. त्यावेळी स्मृती इराणी यांनी वडिलांकडून एक लाख रुपये कर्ज घेतले होते. मात्र यासाठी वडिलांनी स्मृती इराणींसमोर एक अट घातली.’
मुलाखतीत स्मृती इराणी म्हणाल्या की, ‘तिच्या वडिलांनी तिला सांगितले होते, ‘मी तुला पैसे देईन, पण अट अशी आहे की तुला मला व्याजासह पैसे परत करावे लागतील. जर तू पैसे परत करू शकली नाहीस तर मी माझ्या आवडीच्या मुलाशी लग्न करून देईन. वडिलांची ही अट स्मृतींनी मान्य केली होती.’
याविषयी बोलताना स्मृती इराणी म्हणाल्या,’मी मॅकडोनाल्डमध्ये नोकरीसाठी गेले होते तेव्हा फक्त दोनच जागा शिल्लक होत्या. तिथे मला सांगितले की फाउंडेशन जॉब आहे, ज्यामध्ये झाडू, मॉप आणि भांडी करावी लागतील. मग मी नोकरीला हो बोलले. त्यासाठी त्यांनी मला १५०० रुपये दिले.’ असेही त्यांनी सांगितले.
जुन्या दिवसांची आठवण करून देताना स्मृती इराणी म्हणाल्या की, ‘त्या ठिकाणी आठवड्यातून ६ दिवस काम करायच्या. यानंतर सुट्टीत ऑडिशनसाठी जात असे. स्मृती इराणीला तिचा पहिला टेलिव्हिजन शो ऑडिशनद्वारे मिळाला, त्यानंतर ती एकता कपूरच्या क्यूंकी सास भी कभी बहू थी या शोमध्ये तुलसी बनली.’