स्मृती इराणीं यांना काळजी आहे म्हणून त्या निवडणूक जिंकल्या- आशा भोसले

मुंबई – आशा भोसले यांनी नवनिर्वाचित केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांचे आभार व्यक्त केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीनंतर गर्दीतून आपली सुटका केल्याबद्दल आशा भोसलेंनी स्मृती यांचे ट्विट केले आहे की,’पंतप्रधानांच्या शपथविधीनंतर वेड्यासारखी गर्दी उसळली आणि मी अडकले. कोणीही माझ्या मदतीला आलं नाही, मात्र स्मृती इराणी माझी सुटका करण्यासाठी धावून आल्या. त्यांना माझी दैना समजली. मी घरी सुखरुप पोहचेन, याची त्यांनी खात्री बाळगली. त्यांना काळजी आहे म्हणून त्या लोकसभा निवडणूक जिंकल्या.”

स्मृती इराणी यांना मोदी मंत्रिमंडळात महिला आणि बालकल्याण मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.   लोकसभा निवडणुकीत अमेठीतून स्मृती इराणी यांनी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना धुळ चारली होती. अमेठी लोकसभा मतदारसंघात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा 55 हजार 120 मतांनी पराभव करत स्मृती जायंट किलर ठरल्या होत्या.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.