पुणे – दिल्ली ते पुणे प्रवासात विमान हवेत असताना एका प्रवाशाने सिगारेट ओढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी दिल्लीतील एकावर विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नक्षब जहांगिर (३८, रा. रोझ अपार्टमेंट, ओखला विहार, नवी दिल्ली सध्या रा. एस. व्हि. पी.जी, बाणेर गाव) याच्यावर विमान अधिनियम १९३७ च्या कलम ३७ नुसार आणि भारतीय न्याय संहितेच्या १२५ कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत प्रतिक प्रकाश पावले ( ३१, रा. टिंगरेनगर, विश्रांतवाडी) यांनी तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, फिर्यादी प्रतिक पावले हे इंडिगो इअरलाईन मध्ये सिक्युरिटी एक्सिक्युटिव्ह आहेत. ९ सप्टेंबर रोजी रात्री साडेबाराच्या सुमारास नक्षब जहांगिर हे इंडिगोच्या विमानाने दिल्ली ते पुणे प्रवास करत होते. यावेळी विमान हवेमध्ये असताना सिगारेट ओढण्यास मनाई असल्याच्या सुचना फ्लाईट अनाउंसमेंटमध्ये दिल्या होत्या. तरी नक्षब जहांगिर निष्काळजीपणे विमान हवेत असतांना बाथरूमध्ये जावून सिगारेट ओढली.