पुणे-नाशिक मार्गावर धुराचे लोट

चिंबळी फाटा :जाळण्यात आलेल्या कचऱ्यामुळे आकाशात धुराचे लोट उसळले होते.

चिंबळी (वार्ताहर) -पुणे-नाशिक महामार्गावर असलेले हॉटेल व्यावसायीक दिवसभराचा साचलेला कचरा महामार्गाच्याकडेला टाकून तो पेटऊन देतात. त्यामुळे महामार्गावर धुरचे प्रचंड लोट उसळत असल्याने स्थानिकांसह महामार्गावरून जाणाऱ्यांना त्याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे.

त्यामुळे संबंधित हॉटेल व्यावसायिकांना तंबी द्यावी अथवा त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.