संवेदनशील आणि निखळ हास्याची व्याख्या म्हणजे “स्मिता पाटील”

पुणे – अत्यंत नैसर्गिक आणि संवेदनशील अभिनय, मोहक रूप आणि निखळ हास्याची व्याख्या म्हणजे अभिनेत्री “स्मिता पाटील’. कलाविश्वात एक अष्टपैलू अभिनेत्री म्हणून स्मिता पाटील यांना ओळखलं जातं. आपल्या अभिनयानं स्वत:चा एक अनमोल ठसा स्मिता पाटीलनं रसिकांच्या मनावर उमटवला आहे.

याच नैसर्गिक आणि संवेदनशील अभिनेत्रीची आज जयंती… 17 ऑक्टोबर 1955 रोजी पुण्यात स्मिता यांचा जन्म झाला. चित्रपटातील त्यांची कारकीर्द केवळ दहा वर्षांची असली तरी स्मिता केवळ अविस्मरणीय राहिली आहे.

अवघ्या दहा वर्षांच्या सिनेकरिअरमध्ये स्मिता यांनी तब्बल 80 चित्रपट केले. पदार्पणाच्या चार वर्षांनंतर ‘भूमिका’ चित्रपटासाठी त्यांना पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. तर ‘चक्र’ चित्रपटासाठी पुन्हा एकदा राष्ट्रीय पुरस्कारावर मोहोर उमटवली. चित्रपटसृष्टीतील योगदानासाठी 1985 मध्ये  स्मिता पाटील यांना ‘पद्मश्री पुरस्कार’ देखील प्रदान करण्यात आला.

स्मिता यांच पडद्यावरील सोज्वळ सौंदर्यां आणि अभिनयातला सच्चेपणा कायमच प्रेक्षकांना भावला आहे. त्यामुळेच त्यांनी हिंदी आणि मराठी दोन्ही सिनेमांमध्ये स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं. दरम्यान, अवघ्या 31 व्या वर्षी म्हणजेच, 13डिसेंबर 1986 रोजी स्मिता पाटील यांनी जगाचा निरोप घेतला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.