प्री-इंस्टॉल्ड अॅप्समुळे स्मार्टफोन स्लो झालाय, तर मग वापरा या ट्रिक्‍स…

आपण जेव्हा एखादा स्मार्टफोन खरेदी करतो तेव्हा त्यामध्ये अनेक वैशिष्ट्ये असतात. त्यापैकी एक म्हणजे लेटेस्ट ऑपरेटिंग सिस्टिम होय. या ऑपरेटिंग सिस्टिमसोबत स्मार्टफोनमध्ये काही प्री-इंस्टॉल्ड ऍप्सही येतात. यामध्ये असे काही ऍप्स असतात, जे यूजर्सच्या काहीच कामाच्या नसतात. जरी तुम्ही हे ऍप्स वापरत नसाल तरी पण हे ऍप्स तुमच्या स्मार्टफोनमध्ये वाय-फाय, मोबाईल डाटा आणि प्रोसेसर यांचा वापर करतात. तर संबंधित आर्टिकलमध्ये आम्ही तुम्हाला असे ऍप्स हटविण्याच्या ट्रिक्‍स सागंणार आहोत.

पहिली ट्रिक 
– तुमच्या माहितीसाठी प्री-इंस्टॉल्ड ऍप्स हे डिलीट करता येत नाही पण ते आपण ऑफ जरूर करू शकतो. यासाठी फोनच्या सेटिंग्समध्ये जाऊन Device या मेन्यूमधील Appsवर क्‍लिक करा.
– त्यानंतर तुम्हाला याठिकाणी स्मार्टफोनमधील उपलब्ध ऍप्स दिसतील. यापैकी नको असणारं ऍप्स सिलेक्‍ट करा.
– त्यानंतर याठिकाणी दोन पर्याय उपलब्ध असतील. एक Uninstall आणि दुसरा Force Stop असे पर्याय असतील. तर काही ऍप्समध्ये Uninstall हा पर्याय असू शकतो.
– यानंतर संबंधित ऍप स्विच ऑफ होईल आणि स्मार्टफोनमध्ये दिसणार नाही.

दुसरी ट्रिक –
– जर सेटिंग्समधून ऍप डिसेबल होत नसेल तर तुम्ही गुगल प्ले स्टोअरचा वापर करू शकता.
– प्ले स्टोअर वर जाऊन तुम्हाला टॉप लेफ्ट कॉर्नरमधील मेन्यूवर क्‍लिक करावे लागेल.
– My Apps and Games वर क्‍लिक करावे लागेल. याठिकाणी तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनमधील सर्व प्री-इंस्टॉल्ड आणि इंस्टॉल्ड ऍप्स दिसतील. यापैकी जे ऍप्स तुम्हाला नकोत ते ऍप्स तुम्ही Uninstall किंवा Disable करू शकता.

– स्वप्निल हजारे

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.