स्मार्ट क्‍लिनिकचा राष्ट्रीय पातळीवर गौरव

रूबल अग्रवाल यांनी स्वीकारला पुरस्कार

पुणे – केंद्रीय गृहनिर्माण व शहरी कार्ये मंत्रालयाच्या वतीने देण्यात येणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील “इंडिया स्मार्ट सिटीज्‌’ पुरस्कारांमध्ये पुणे स्मार्ट सिटीने पुन्हा एकदा मोहोर उमटवली आहे. पुणे स्मार्ट सिटीचा स्मार्ट क्‍लिनिक प्रकल्पास सामाजिक श्रेणीतील पुरस्कार मंत्रालयाचे सचिव दुर्गा शंकर मिश्रा यांच्या हस्ते स्मार्ट सिटीच्या प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी रूबल अग्रवाल यांनी स्वीकारला.

विशाखापट्टणम येथे सुरू असलेल्या स्मार्ट सिटी परिषदेत या पुरस्काराचे नुकतेच वितरण करण्यात आले. स्मार्ट सिटी मिशनचे संचालक कुणाल कुमार यावेळी उपस्थित होते.

स्मार्ट क्‍लिनिक उपक्रमांतर्गत पुणे स्मार्ट सिटीने बाणेर येथे मागील वर्षी पहिले स्मार्ट क्‍लिनिक सुरू केले. मूलभूत आरोग्य सेवेसाठीच्या सर्व सोयीसुविधांनी सुसज्ज असलेले हे क्‍लिनिक नागरिकांसाठी सोयीस्कर वेळांमध्ये सेवा पुरविते. यामुळे चांगला प्रतिसाद मिळत आहे. विनामूल्य ओटीसी औषधे पुरवण्यासोबतच काही महत्त्वाच्या चाचण्या अनुदानित दराने येथे केल्या जातात.

स्मार्ट क्‍लिनिक प्रकल्पाला राष्ट्रीय स्तरावर मिळालेला हा पुरस्कार राष्ट्रीय पातळीवर मान्यता व सन्मान मिळणे ही अभिमानास्पद बाब आहे. यामुळे स्मार्ट सिटीअंतर्गत आणखी लोकोपयोगी राबवण्यास प्रेरणा मिळणार आहे.
– रूबल अग्रवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट सिटी

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.