औंध-बाणेरचे “लिंक’ रस्तेही होणार “स्मार्ट’

महापालिकेच्या सूचना : आवश्‍यक मान्यता देणार

पुणे – “स्मार्ट सिटी’ योजने अंतर्गत क्षेत्र विकासासाठी निवडलेल्या औंध आणि बाणेर भागातील रस्त्यांची पुनर्रचना केली जात आहे. मात्र, “स्मार्ट सिटी’ने फक्‍त त्या रस्त्यांची पुनरर्चना न करता, त्यांना जोडणाऱ्या महापालिका हद्दीतील “लिंक’ रस्त्यांचाही परिसर सुशोभित करावा, अशा सूचना महापालिकेने “स्मार्ट सिटी’ प्रशासनास केल्या आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

“स्मार्ट सिटी’च्या प्रलंबित विविध मान्यतांच्या विषयांवर निर्णय घेण्यासाठी झालेल्या संयुक्त बैठकीत या सूचना करण्यात आल्या. “स्मार्ट सिटी’तील क्षेत्र विकासासाठी औंध-बाणेरचा विस्तार आता बालेवाडीपर्यंत होणार आहे. यात प्रमुख रस्त्यांची पुनर्रचना करण्यात येत आहे. वाहतूक, पादचाऱ्यांसाठी विषेश सुविधा, प्लेस मेकिंग अशा पद्धतीने रस्त्याची अभिनव रचना केली जात आहे. त्यामुळे रस्त्यांचे रूप पालटले असून या कामांबाबत समाधान व्यक्त केले जात आहे.

मात्र, “स्मार्ट सिटी’ हा फक्‍त त्या भागाचा नाही, तर संपूर्ण शहराचा प्रकल्प आहे. त्यामुळे उर्वरित शहरातून त्या भागात गेल्यानंतर या भागातच असे रस्ते आहेत, असे नागरिकांना वाटू नये म्हणून या रस्त्यांना जोडणारे “लिंक’ रस्तेही त्याच पद्धतीने सुशोभित केल्यास त्याचा फायदा होईल, ही बाब लक्षात घेऊन स्मार्ट सिटीत पुनर्रचना केलेल्या रस्त्यांना जोडणारे “लिंक’ रस्तेही त्याच पद्धतीने विकसित करावेत. त्यासाठी आवश्‍यक मान्यता महापालिका देईल, अशा सूचना केल्याचे आयुक्‍त सौरभ राव यांनी स्पष्ट केले. त्यासाठी “स्मार्ट सिटी’नेही तयारी दर्शविल्याचे ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)