एसटी महामंडळाच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी स्मार्ट कार्ड योजना

वाघळवाडी: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी महामंडळ) यांच्या वतीने ६५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी स्मार्ट कार्ड योजना सुरू करण्यात आली आहे. त्याकरिता महामंडळाकडून स्मार्ट कार्ड प्राप्त करणेआवश्यक आहे.

या स्मार्ट कार्डचा उपयोग ज्येष्ठ नागरिक एसटीमध्ये प्रवास करताना हाफ तिकीट तसेच रोख रक्कम न बाळगता कॅशलेस व्यवहाराकरता वापरू शकतात.

या स्मार्ट कार्डचा वापर खात्यावर पैसे भरून बाजारात खरेदीसाठी सुद्धा होऊ शकतो. हे कार्ड मिळवण्यासाठी आधार कार्ड, मतदान कार्ड किंवा मतदान स्लीप व मोबाईल आवश्यक आहे.

वाघळवाडी ग्रामपंचायत कार्यालय येथे दि. २२ सकाळपासून सोमेश्वर पंचक्रोशीतील ज्येष्ठ नागरिकांनी या कॅम्पसाठी गर्दी केली होती. ज्येष्ठ नागरिकांना बारामतीत जाऊन कार्ड काढावे लागेल हि अडचण लक्षात घेत वाघळवाडीतील ऋतुराज गायकवाड यांनी गावामध्ये या कॅम्पचे आयोजन केले होते. यामध्ये १३० ज्येष्ठ नागरिकांनी नोंदणी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)