उत्तर प्रदेशात छोटे विमान कोसळले; वैमानिक ठार

आझमगड, (उत्तर प्रदेश) – उत्तर प्रदेशातील आझमगडमध्ये आज चार आसनी छोटे विमान कोसळले. या दुर्घटनेमध्ये प्रशिक्षणार्थी वैमानिक मरण पावला, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले. 

आझमगड जिल्ह्यात साऐ मीर पोलीस स्थानकाच्या हद्दीतील कुशाहा फरिउद्दीनपूर गावातल्या एका शेतजमिनीवर सकाळी साडे 11 वाजण्याच्या सुमारास हे विमान कोसळले. खराब हवामानामुळे हा अपघात झाला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

हे विमान शिकावू वैमानिकांच्या प्रशिक्षणासाठी वापरले जात होते. विमान प्रशिक्षण संस्थेतून या विमानाने उड्डाण केले होते, असे आझमगडचे जिल्हा दंडाधिकारी राजेश कुमार यांनी सांगितले. अपघात झाला तेंव्हा विमानामध्ये केवळ वैमानिकच होता.

हे विमान अमेठीतील केंद्र सरकार संचलित इंदिरा गांधी राष्ट्रीय उडान ऍकेडमी या उड्डाण प्रशिक्षण संस्थेच्या मालकीचे होते. आझमगड पोलीस कर्मचारी आणि वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून मदत आणि बचाव कार्याला सुरुवात केली गेली आहे, असे आझमगडच्या पोलिसांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.