मुंबई – इंटरनेटवर सर्वाधिक वापरलं जाणारं सर्च इंजिन गुगलने आज एक खास डूडल तयार केलं आहे. आजचा दिवस (२२ डिसेंबर) हा भोगोलिकदृष्ट्या अतिशय महत्वाचा आहे. त्यामुळेच हे खास डुडल तयार करण्यात आले आहे.
२२ डिसेंबर हा संपूर्ण वर्षातला छोटा दिवस असतो आणि सर्वात मोठी रात्र असते. आणि याच दिवसापासून पृथ्वीच्या उत्तर गोलार्धातील प्रदेशांमध्ये थंडीची सुरुवात असून, ही थंडी 20 मार्चपर्यंत असते.
आजच्या दिवशी सूर्य पृथ्वीपासून खूप दूर असतो शिवाय चंद्राचा प्रकाश पृथ्वीवर फार वेळ असतो. याला इंग्रजीत समर सॉल्सटिस असं म्हटलं जातं. समर सॉल्सटिसमध्ये सूर्याची किरणं भूमध्य रेषेच्या दक्षिणेला अधिक प्रमाणात पोहोचतात. त्यामुळे उत्तर गोलार्धात थंडीचा मोसम सुरू होतो.
दरम्यान, या दिवसानिमित्त गुगलनेही बर्फाळ प्रदेशातल्या आईसबेबीला बनवून हा गुलाबी मोसम आल्याचा आनंद साजरा केला आहे. या डुडलमध्ये पृथ्वीच्या डोक्यावर ही आईस बेबी दिसत आहे.