शास्ती कर रद्द करण्याचा लघु उद्योजकांचा निर्धार

पिंपरी चिंचवड लघु उद्योग संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा
पिंपरी – पिंपरी चिंचवड लघु उद्योग संघटनेची सन 2018-19 या वर्षाकरिता 39 वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच संघटनेच्या थरमॅक्‍स चौक येथील कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. यावेळी शास्ती कर रद्द करण्यासाठी प्रयत्नशील राहू, असा निर्धार करण्यात आला.

सभेच्या अध्यक्षपदी संदीप बेलसरे यांची निवड करण्यात आली. त्यासाठी संजय सातव यांनी नाव सुचवले, त्यास विजय खळदकर यांनी अनुमोदन दिले. अध्यक्ष संदीप बेलसरे व सर्व संचालकांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. संचालक शिवाजी साखरे यांनी मागील सभेचा इतिवृत्तांताचे वाचन केले. खजिनदार संजय ववले यांनी सन 2018-19 या वर्षाचा ताळेबंद सादर केला. संघटनेने आजपर्यंत केलेल्या विविध कामाचा आढावा सचिव जयंत कड यांनी घेतला.

माजी अध्यक्ष सुरेश म्हेत्रे यांनी टी -201 पुनर्वसन प्रकल्प, महानगर पालिका, प्राधिकरण यांच्या संदर्भात उद्योजकांना भेडसावनाऱ्या समस्यांबाबत संघटनेने केलेल्या कार्याचा आढावा घेतला. उपाध्यक्ष संजय जगताप यांनी सन 2019-20 या वर्षाकरता अंदाजपत्रक मांडले. सभेने त्यास बहुमताने मंजुरी दिली.
संघटनेचे भोसरी येथील सभासद श्रीपाद इंटर.चे मालक रावडे यांच्या मुलाचे शास्तीकराच्या धक्‍क्‍याने नुकतेच निधन झाले, अशी वेळ इतर कुणावर येऊ नये म्हणून संघटनेतर्फे शासन दरबारी प्रयत्न करावेत, अशी सूचना मांडण्यात आली.

संदीप बेलसरे म्हणाले, औद्योगिक आस्थापनांना लावण्यात आलेला शास्तीकर पूर्व लक्षी प्रभावाने रद्द करण्यासाठी संघटना पुढील काळात प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगतले. तसेच वाढीव वीजबिल दर रद्द करण्यासाठी शासनाने महावितरणला अनुदान द्यावे जेणे करून महावितरणला दर वाढ करावी लागणार नाही. दंड लागल्यामुळे अनेक उद्योजकांचे वीज बिल वाढले आहे. उद्योजकांनी आपल्या कंपनीमध्ये नवीन यंत्रणा बसवण्याचे आवाहन त्यांनी केले. संचालक प्रमोद राणे यांनी सूत्रसंचालन केले.

संजय आहेर यांनी आभार मानले. संजय जगताप, विनोद नाणेकर, प्रमोद राणे, दीपक फल्ले, नवनाथ वायाळ , प्रवीण लोंढे, स्वीकृत संचालक अतुल इनामदार, सुनील शिंदे, शांताराम पिसाळ , विजय भिलवडे, प्रमोद दिवटे, कैलास भिसे, अशोक अगरवाल, निसार सुतार, बशीर तरसगार, अनिल कांकरिया, शशिकांत सराफ, सुहास केसकर, पांडुरंग वाळूंज, प्रभाकर धनोकार उपस्थित होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)