हृदयद्रावक ! आईच्या डोळ्यासमोर चिमुकल्याचा मृत्यू

सांगली – भरधाव डंपरने धडक दिल्याने दोन वर्षीय चिमुकल्याचा आईच्या डोळ्यासमोर मृत्यू झाल्याची मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. अवधूत योगेश कुंभार असे चिमुकल्याचे नाव असून हा अपघात सोमवारी शाळगाव-कडेगाव रस्त्यावर विहापूर येथे झाला. या घटनेने विहापूर गावावर शोककळा पसरली आहे. याप्रकरणी पोलिसांनी डंपर चालकाला ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अवधुत याची आई प्रियांका आपल्या राहत्या घरासमोर डेअरीच्या गाडीमध्ये दुध घालण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी अवधुत रस्त्याच्या कडेला उभा होता. अचानक शाळगावहून कडेगावकडे जाणाऱ्या भरधाव डंपरची अवधूतला जोरदार धडक बसली. डोक्याला गंभीर इजा होऊन रक्तस्त्राव झाल्याने चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला.

आई प्रियांकाच्या डोळ्यासमोर ही घटना घडली. आपल्या एकुलत्या एक पोटच्या गोळ्याचा दुर्दैवी मृत्यू पाहून त्यांनी अक्षरश: हंबरडा फोडला.

अपघाताची माहिती मिळताच कडेगाव पोलिसांनी विहापूर येथे घटनास्थळी धाव घेतली. आपघाताच्या घटनेचा पंचनामा केला. डंपरचालक गणेश मोहन दोडके याच्यासह डंपर पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. अधिक तपास कडेगाव पोलीस करत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.