वॉशिंगटन : इंटरनॅशनल स्पेस स्टेशनच्या रशियन भागात हवेची गळती झाल्याची घटना समोर आली आहे. त्यानंतर संबंधित भाग दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. ही घटना घडली तेव्हा या स्पेस स्टेशनवर एक अमेरिकन आणि दोन रशियन अवकाशयात्री होते.
अमेरिकेची स्पेस एजन्सी नासाने दिलेल्या माहितीप्रमाणे अवकाशवीर सुरक्षित असून हवेची गळती झालेला भाग दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. हवेची गळती होत असल्याचे लक्षात येताच संबंधित भाग मुख्य स्टेशनपासून लगेच अलग करण्यात आला. हवेची गळती होण्याचे प्रमाण प्रत्येक सेकंदामागे वाढत चालल्याने फ्लाइट कंट्रोलर्सनि त्वरित उपाय योजण्यास प्रारंभ केला.
नासाचे अंतरिक्षयात्री आणि स्टेशन कमांडर क्रिस कैसिडी, रशियन अंतरिक्षयात्री अनातोली आणि इविनेशिन इवान वैगनर या स्पेस स्टेशनमध्ये कार्यरत होते. त्यांना या हवेच्या गळतीची संपूर्ण माहिती पाठवण्यास सांगण्यात आले आहे.