कोलंबो : सलामीवीर अविष्का फर्नांडो आणि दिमुथ करूणारत्ने यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर श्रीलंकेने मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यात वेस्टइंडिजवर १ विकेटनी विजय मिळवला आहे. यासह श्रीलंकेने तीन एकदिवसीय सामन्याच्या मालिकेत १-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. सामन्यात अष्टपैलू कामगिरी करणारा श्रीलंकेचा वाणिदु हसरंगा सामन्याचा मानकरी ठरला.
🇱🇰 win by 1 wicket and take 1-0 lead in the 3-match series! This is the highest sucessful run chase at SSC.
SL 290/9 (49.1 ov) vs WI 289/7 #SLvWI pic.twitter.com/C5xhHYz0WI— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) February 22, 2020
विंडीजने विजयासाठी दिलेले २९० धावांचे आव्हान श्रीलंकेने ५ चेंडू आणि १ विकेट राखून पूर्ण केले. श्रीलंकेकडून अविष्का फर्नांडोने ५०(५५), दिमुथ करूणारत्नेने ५२(५७) आणि कुसल परेराने ४२(५०) धावांची खेळी केली. त्यानंतर शेवटच्या क्षणी तिसारा परेराने ३२(२२) आणि वाणिदु हसरंगाने नाबाद ४२(३९) धावा करत श्रीलंकेचा विजय साकारला.
विंडीजकडून अलजारी जोसफने ३, कीमो पाॅल आणि हेडन वाल्शने प्रत्येकी २ तर जेसन होल्डरने १ गडी बाद केला.
तत्पूर्वी, श्रीलंकेने टाॅस जिंकून गोलंदाजी स्विकारली होती. त्यानंतर प्रथम फलंदाजी करताना विंडीजने शाइ होपच्या ११५(१४०),डॅरेन ब्रावोच्या ३९(५२) , राॅसटन चेजच्या ४१(४५) आणि कीमो पाॅलच्या नाबाद ३२(१७) धावांच्या खेळीच्या जोरावर ५० षटकात ७ बाद २८९ अशी मजल मारली होती.
श्रीलंकेकडून गोलंदाजीत इसुरू उदाना याने सर्वाधिक ३ तर नुवान प्रदीप आणि तिसारा परेरा यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.