स्लायडिंग गेट कोसळून जखमी झालेल्या चिमुरडीचा मृत्यू

नागपूर – घरासमोर लावलेला स्लायडिंगचा लोखंडी गेट अंगावर पडून चिमुरडीचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना नागपुरात घडली आहे. या दुर्घटनेत 18 महिन्यांच्या निहारिका माहुले हिला प्राण गमवावे लागले.

रवी आणि निकिता माहुले या दाम्पत्याची निहारिका ही एकुलती एक लेक. हुडकेश्वर परिसरातील चक्रपाणीनगरमध्ये हेडाऊ यांच्या घरी भाड्याने राहणाऱ्या माहुले कुटुंबासोबत बुधवारी रात्री अघटित घडले. निहारिकाचा काका पंकज रात्री घरी पोहचला. तो गेटमधून बाईक घरात घेत होता. तितक्‍यात निहारिकाने काकाला भेटण्यासाठी धाव घेतली. पंकज स्लायडिंग गेट बंद करत असताना ते निहारिकाच्या अंगावर पडले.

पंकजने आरडाओरड करुन सर्वांना बोलावले. सर्वांनी निहारिकाच्या अंगावर पडलेला गेट हटवला. मात्र या दुर्घटनेत निहारिका गंभीर जखमी झाली होती. तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिचा नुकताच मृत्यू झाला. लाडक्‍या निहारिकाच्या मृत्यूने माहुले कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.