मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. या निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडी दोघांनीही जोरदार तयारी सुरु केली आहे. यामध्ये महायुतीनं प्रचारात आघाडी घेतील असून विधानसभा निवडणुकीसाठी घोषवाक्य देखील ठरवण्यात आलं आहे. ‘एकजुट महाराष्ट्रासाठी अभियान, विकासासाठी कल्याणासाठी’ हे घोषवाक्य घेवून महायुती राज्यभर प्रचार करताना दिसणार आहे.
’एकजुट महाराष्ट्रासाठी अभियान, विकासासाठी कल्याणासाठी’ हे घोषवाक्य घेवून महायुती राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांचा प्रचार करणार आहे. ठाण्यातील महायुती मेळाव्यात भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी याबाबत घोषणा केली. तसंच महायुतीकडून सोशल मीडिया आर्मी देखील तयार करण्यात येणार आहे. फेक नरेटिव्हला उत्तर देण्याचं काम ही सोशल मीडिया आर्मी करणार आहे.
‘या’ दिवशी करणार प्रचाराचा श्रीगणेशा
दरम्यान 24 ऑगस्टला विधानसभेसाठी महायुतीच्या प्रचाराचा नारळ फुटणार आहे. 24 ऑगस्टपासून प्रचाराला सुरुवात होणार आहे. ठाण्यातून पहिली प्रचार यात्रा निघणार आहे. तीन दिवस ही प्रचार यात्रा चालणार आहे. ठाणे, पालघर, नवी मुंबई अशी ही महायुतीची प्रचार यात्रा असणार आहे.