पुन्हा एकदा ऐकू येणार ‘हिंदुस्थान जिंदाबाद’चा नारा, ‘गदर’ चित्रपटाचा सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!

अनिल शर्मा दिग्दर्शित ‘गदर’ हा चित्रपट बॉक्‍स ऑफिसवर हिट ठरला होता. सनी देओल, अमिषा पटेल, अमरीश पुरी यांची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाने रेकॉर्डब्रेक कमाई केली होती. या चित्रपटामुळे अमिषा पटेल आणि सनी देओल या दोघांच्याही करिअरला भरारी मिळाली होती. या चित्रपटाला वीस वर्षे पूर्ण झाली असून याचा सिक्‍वल येणार असल्याची चर्चा आहे.

भारत आणि पाकिस्तानची झालेली फाळणी, त्या फाळणीचे दोन्ही देशातील सामान्य जनतेवर झालेले परिणाम, सकिना आणि तारासिंग यांची प्रेम कहाणी यावर आधारलेला ‘गदर’ आजही तितक्‍याच आवडीने पाहिला जातो. ‘गदर’ चित्रपटातील गाण्यांनी देखील लोकांच्या मनावर जादू केलेली होती. ‘मैं निकला गड्डी लेके’ या गाण्याने तर लोकांना अक्षरशः वेड लावले होते. अनिल शर्मा हेच ‘गदर 2’चे दिग्दर्शक असणार आहेत. सनी देओलला

तारा सिंगच्या भूमिकेमध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. ‘गदर 2’मध्ये सनी देओल आपल्या मुलाला परत आणण्यासाठी पाकिस्तानात जातो, हे दाखवण्यात येणार असल्याची शक्‍यता आहे. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. यामुळे चाहत्यांमध्ये आतापासून चित्रपटाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.