नवी दिल्ली – जानेवारी महिन्यामध्ये पायाभूत क्षेत्राची उत्पादकता केवळ 0.1 टक्क्यांनी वाढली आहे. गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात पायाभूत क्षेत्राची उत्पादकता 2.2 टक्क्यांनी वाढली होती.
म्हणजे पायाभूत सुविधा क्षेत्रातील मोठे उद्योग आणखीही पूर्वपदावर आलेले नाहीत.
नैसर्गिक वायू, सिमेंट उत्पादन वाढण्याऐवजी कमी झाले आहे. खत आणि वीज उत्पादनात थोडी फार वाढ झाली आहे. एप्रिल ते जानेवारी या काळातील पायाभूत क्षेत्राची उत्पादकता उणे 8.8 टक्के इतकी नोंदली गेली आहे. त्यामुळे या आकडेवारीचा भारताच्या एकूण वर्षाच्या राष्ट्रीय उत्पन्नावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.