दिलासा ! नवीन करोना रूग्णसंख्येत किंचित घट

नवी दिल्ली – सलग दोन दिवसांच्या वाढीनंतर काल दिवसभरात रुग्णसंख्या घटली आहे. काल दिवसभरात देशभरात करोनाच्या 35 हजार 342 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे, तर 483 जणांचा मृत्यू झाला आहे.

सलग दुसऱ्या दिवशी उपचाराधीन बाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे. देशात 4 लाख 5 हजार 513 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नुकत्याच दिलेल्या आकडेवारीनुसार देशभरात काल 38 हजार 740 रुग्णांनी करोनावर मात केली आहे.

आज बाधित रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. लसीकरणाने देखील देशात जोर पकडला आहे. देशात 42 कोटी 34 लाख 17 हजार 30 लसीचे डोस देण्यात आले आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.