कोल्हापूरात आजपासून 5 दिवस कत्तलखाने बंद

नव्या वादाला कोल्हापुरात सुरुवात

कोल्हापूर : कोल्हापूर म्हटले की तांबडा पांढरा रस्सा हे एक समीकरण आहे. पण कोल्हापूरातील कत्तलखाने पुढचे पाच दिवस बंद करण्याचा दंडाधिकारी यांनी आदेश काढल्याने एक नवा वाद समोर आला आहे. 29 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर या कालावधीत कोल्हापुरातील मटन, चिकन विक्री बंद ठेवण्यात यावी याबाबतचे आदेश दंडाधिकारी यांनी दिला आहे. हा आदेश अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघाच्या मागणीनुसार जारी करण्यात आल्याचा आरोप सकल मराठा समाजाकडून करण्यात आला असून याला आमचा विरोध असून अशा प्रकारचे आदेश आमच्यावर लादण्याचा प्रयत्न करत असाल तर वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा सकल मराठा समाजाकडून देण्यात आला आहे.

भारतातील जैन धर्मियांचा महत्त्वाचा सण म्हणजे पियुषण महापर्व या सणात हिंसा होऊ नये व हा सन त्यागाचे प्रतीक म्हणून धर्म आराधना करून साजरा केला जातो त्यामुळे या काळात कत्तल होऊ नये म्हणून अखिल भारतीय जैन अल्पसंख्यांक महासंघ यांनी निवेदन दिलं होतं या निवेदनाची दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ कत्तलखाने पाच दिवस बंद करण्याचे आदेश दिले होते. शिवाय परप्रांतीयांच्या मागणीवरून हे असे आदेश निघत असतील तर वेळप्रसंगी या परप्रांतीयांना इथून हकलवून लावा असा दम सुद्धा यावेळी सकल मराठा समाजाकडून देण्यात आला.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.