बहुचर्चित स्काय फोर्स सिनेमा २४ जानेवारीला थिएटर्समध्ये रिलीज झाला. रिलीजच्या पहिल्या विकेंडमध्ये सिनेमाने दमदार कमाई केली. मात्र, विकेंडनंतर या सिनेमाच्या कमाईत मोठी घसरण झाल्याचे पाहिला मिळत आहे. स्काय फोर्स सिनेमात अभिनेता अक्षय कुमार आणि वीर पहारिया यांच्या प्रमुख भूमिका आहेत. स्काय फोर्स सिनेमाची कथा देशभक्तीवर आधारलेली आहे. २४ जानेवारीला प्रदर्शित झालेल्या या सिनेमाला २६ जानेवारीला या दिवशी मोठा प्रतिसाद मिळाला आहे.
स्काय फोर्स सिनेमात १९६५ च्या भारत पाकिस्तान हवाई युद्धात भारताचा पहिला हवाई हल्ला, पाकिस्तानचा सरगोधा एअरबेस हल्ला यावर आधारित आहे. या सिनेमात अभिनेता अक्षय कुमार, वीर पहारिया यांच्यासोबत सारा अली खान आणि निम्रत कौर यांच्या देखील प्रमुख भूमिका आहेत.
चौथ्या दिवशी आकड्यात मोठी घसरण
या सिनेमाने रिलीजच्या दिवशी १५.३० कोटी रुपयांचे ओपनिंग कलेक्शन केले. शनिवारी या सिनेमाच्या कलेक्शमध्ये काही प्रमाणात वाढ होऊन सिनेमाने २६.३० कोटी रुपयांची दमदार कमाई केली. यानंतरच्या दिवशी रविवार सुट्टीचा दिवस आणि २६ जानेवारी असल्याने या एकाच दिवशी तब्बल ३१.६० कोटी रुपयांचा गल्ला जमवला. या चार दिवसात स्काय फोर्स सिनेमाने भारतात ८६.४० कोटी तर जगभरात ९२.९० कोटी रुपयांची कमाई केली. मात्र, चौथ्या दिवशीच्या कमाईत मोठी घसरण झाली असून अवघे ६.२५ कोटी रुपयांची कमाई या सिनेमाने केली आहे.
माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवाचे बॅालीवूडमध्ये पदार्पण
या सिनेमातून राज्याचे माजी. मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू वीर पहारियाने बॅालीवूडमध्ये पदार्पण केले आहे. त्याच्या पहिल्याच सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून त्याच्या अभिनयाचे कौतुक केले जात आहे. वीरची पार्श्वभूमी कौटुंबिक राजकारणाची असली तरी सिनेविश्वातील त्याच्या पदार्पणाला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळताना दिसत आहे.