पुणे: गुरु तेगबदुर फुटबॉल स्पर्धेत डीएमरआर एसकेएफ, साई आणि इनफॅटस संघानी विजयी सलामी दिली. पहिल्या सामन्यात डीएमआर संघाने गोल्डन फिदरचा 3-1 असा, एसकेएफने फ्रेंड्सचा 4-0 असा, साईने हाय लॅंडरचा टायब्रेकमध्ये 4-3 असा तर, इन्फॅन्ट्सने फाल्कमचा 2-1 असा पराभव करत स्पर्धेत विजयी सलामी दिली.
या स्पर्धेचे उद्घाटन गुरुद्वारा गुरू नानक दरबारचे प्रमुख सरदार हरमिंदरसिंग घई यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी आयोजक राणी अहलुवालिया, सोना सिंग, गुरमीत सिंग, संतोखसिंग राजपाल, भोलासिंग अरोरा, सुरजीतसिंग बग्गा, संध्या, निलू भरुचा, महजबीन व्होरा, प्रीती पवार, आर. के. सहा, ललित शाह, विजय सोनावणे, श्री व सौ. अहलुवालिया, करमजीतसिंग, गुरमीतसिंग रत्तु, बंटी सिंग आदी उपस्थित होते.