-->

साठ वर्षीय वृद्धावर चार विवाह केल्याचा गुन्हा दाखल

पिंपरी – पहिल्या बायकोचे निधन झाल्याचे खोटे सांगून दुसरे लग्न केले. त्यानंतर दुसऱ्या बायकोच्या परस्पर तिसरे आणि चौथेही लग्न केले. यातील एका पत्नीने चार-चार लग्न करणाऱ्या 60 वर्षीय पतीच्या विरोधात थेट बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

चऱ्होली बुद्रुक येथील 60 वर्षीय व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्या दुसऱ्या पत्नीने याबाबत फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार सन 2013 ते 20 डिसेंबर 2020 या कालावधीत विनायक नगर नवी सांगवी, भोसरी, प्रतीक लॉज चाकण, नित्यानंद लॉज फुरसुंगी येथे घडला आहे. आरोपी व्यक्तीने त्याच्या पहिल्या पत्नीचा मृत्यू झाल्याचे खोटे सांगून फिर्यादी महिलेसोबत सन 2014 साली विवाह केला. त्यानंतर त्याने आणखी दोन महिलांसोबत विवाह केला. त्यामध्ये एका पोलीस महिलेचा देखील समावेश आहे. फिर्यादी महिलेच्या परस्पर विवाह करून तिची फसवणूक केली.

लग्नाच्या अगोदर आणि लग्नानंतर फिर्यादी महिलेचा क्रूरतेने लैंगिक छळ केला. फिर्यादी महिलेला आरोपीने मारून टाकण्याची धमकी दिली. हा त्रास वाढत गेल्याने तिने थेट पोलीस ठाणे गाठत गुन्हा नोंदवला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.