सहावा भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान चित्रपट महोत्सव 22 ते 25 डिसेंबर

नवी दिल्ली – भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवाचा एक भाग म्हणून भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान चित्रपट महोत्सव आभासी पद्धतीने 22 ते 25 डिसेंबर या काळात आयोजित करण्यात आला आहे.

नागरिकांमध्ये विज्ञानाच्या लोकप्रियतेसाठी “आयआयएसएफआय’ प्रयत्न करीत आहे, आणि प्रतिभावान तरुण विज्ञान चित्रपट निर्माते आणि विज्ञानाबाबत उत्सुक व्यक्तींना आकर्षित करण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे.

विज्ञान विषयक गोडी वाढविण्यासाठी, नागरिकांमध्ये विज्ञान विषयक उत्सुकता मोठ्या प्रमाणात वाढविण्यासाठी विज्ञान चित्रपट हे एक प्रभावी साधन आहे, या वर्षी 60 देशांमधून 632 विज्ञान माहितीपट, लघुपट, अनिमेशन व्हिडिओ प्राप्त झाले आहेत.

आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रशंसा झालेले आणि पारितोषिक विजेते परदेशी, भारतीय विज्ञान, आरोग्य आणि पर्यावरण विषयक चित्रपटांचे ऑनलाइन प्रदर्शन केले जाईल. भारतीय आणि आंतरराष्ट्रीय व्यावसायिक आणि विद्यार्थी चित्रपट निर्मात्यांसाठी एक स्पर्धा आयोजित केली जात आहे.

स्पर्धात्मक श्रेणीत नसलेल्या गटामध्ये भारतासह 23 देशांकडून 75 अर्ज प्राप्त झाले आहेत. हे नामांकित चित्रपट 22 ते 25 डिसेंबर या काळात विज्ञान प्रसारच्या यूट्यूब चॅनेलवर आणि भारत विज्ञान महोत्सव चॅनेलवर प्रदर्शित केले जाणार आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.