पिंपरी- चौथ्या दिवशी सहा अर्ज दाखल

यांनी भरला उमेदवारी अर्ज


शुक्रवारी मावळ लोकसभेसाठी भिमराव आण्णा कडाळे यांनी हिंन्दुस्थान जनता पार्टीकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. याबरोबरच नवनाथ विश्‍वनाथ दुधाळ यांनीही अपक्ष म्हणून दुसरा अर्ज सादर केला. बळीराजा पार्टीकडून गुणाट संभाजी नामदेव, अपक्ष म्हणून अजय हनुमंत लोंढे, भारतीय प्रजा सुराज्य पक्षाकडून मदन शिवाजी पाटील यांनी दोन अर्ज सादर केले. तसेच सुनिल बबन गायकवाड यांनी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीकडून व विजय हनुमंत रांदेल यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. आज दिवसभरात 6 उमेदवारांनी अर्ज सादर केले आहेत.


पिंपरी –
मावळ लोकसभेच्या निवडणूक आखड्यातील रंगत आता वाढू लागली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याचे सुरुवातीचे तीन दिवस शांत-शांत गेल्यानंतर चौथ्या दिवशी विविध राजकीय पक्षांबरोबरच अपक्ष उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. आज शुक्रवारी 8 जणांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत. गुरुवारी अपक्ष उमेदवारी दाखल केलेल्या नवनाथ दुधाळे यांनी आज आपला दुसरा अर्ज दाखल केला. त्यामुळे, आत्तापर्यंत मावळच्या आखाड्यात 7 जणांनी उडी घेतली आहे. सोमवारी व मंगळवारी प्रमुख उमेदवाराबरोबरच काही अपक्ष उमेदवारही उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

राज्यात सुरवातीपासूनच चर्चेत आलेल्या मावळ लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया 2 एप्रिल पासून सुरु झाली. निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाल्यानंतर सुरवातीचे 2 दिवस एकाही उमेदवाराने उमेदवारी अर्ज भरला नव्हता. शुक्रवार दि. 4 एप्रिल रोजी नवनाथ दुधाळे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करत अर्ज भरण्याचा “श्रीगणेशा’ केला होता. त्यानंतर शुक्रवारी (दि.5) एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अनेकांनी गर्दी केल्याचे चित्र नगरविकास प्राधिकरण येथील निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयात पहायला मिळाले. त्यामुळे, मावळ लोकसभेच्या आखाड्यात आत्तापर्यंत 7 जणांनी आपले उमेदवारी अर्ज भरले आहेत. शुक्रवारी चार उमेदवारी अर्जांची विक्री झाली आहे. आत्तापर्यंत 38 उमेदवारी अर्जांची विक्री झाली असून त्यापैकी 2 उमेदवारांचे प्रत्येकी दोन व इतर 6 उमेदवाराचे प्रत्येकी एक याप्रमाणे 9 अर्ज दाखल
झाले आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.