सोळा राज्यांत पाण्याचे भीषण संकट : जलसंरक्षक राजेंद्र सिंह

-महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशाचा समावेश

-देशातील बहुतांश छोट्या नद्यांतील पाणी आटले

नवी दिल्ली -देशातील 16 राज्यांतील 352 हून अधिक जिल्हे हे दुष्काळाचा सामना करत आहेत. केरळ, कर्नाटक, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि महाराष्ट्राचा यात समावेश आहे. देशातील 90 टक्‍क्‍यांहून अधिक छोट्या नदी आटल्या आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी पाण्याचे संकट निर्माण झाले आहे असे पर्यावरण आणि जलसंरक्षक राजेंद्र सिंह यानी म्हटले आहे.

एका कार्यक्रमात बोलताना राजेंद्रसिंह म्हणाले की, हे पक्ष लोकांना भेडसावणाऱ्या वास्तविक समस्या दूर करण्याऐवजी फक्त सत्तेत येण्यास इच्छुक आहेत. सत्तेत आल्यास हवेच्या गुणवत्तासंबंधित प्रश्न सोडवण्यासाठी पाऊल उचलले जाईल, असे कॉंग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात म्हटले आहे. राजकीय पक्षांना अजून पर्यावरणाचे महत्त्व जाणवलेले नाही. कोणताही राजकीय पक्ष जल, पर्यावरण किंवा हवेच्या गुणवत्तेसंबंधीत प्रश्‍नांना गंभीरपणे घेत नाही. त्यामुळे जनतेचे प्रश्‍न आगामी काळात वाढणार आहेत.

राजेंद्र सिंह यांनी लोकांना आवाहन करताना म्हटले की, लोकांनी अशा नेत्यांना मतदान करावे जे देशातील जल संसाधन आणि नदीच्या स्थितीत बदल आणतील. भारतीय समाजाला धर्म आणि जातीमध्ये विभागू पाहणाऱ्यांना त्यांनी कधीच मत देऊ नये.

ते म्हणाले की, गंगा नदी आधीपेक्षाही जास्त प्रदूषित झाल्याचा आरोप केला आहे. नमामी गंगा योजनेअंतर्गत गंगा नदीचे फक्त सौंदर्यीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे. गंगा नदी आधीपेक्षाही जास्त प्रदूषित झाली आहे. नमामी गंगा योजनेतून नदीची स्वच्छता किंवा नदीतील प्रदूषित घटक काढण्याऐवजी केवळ नदी परिसरातील सौंदर्यीकरण करण्यापर्यंतच ती मर्यादित राहिली आहे, असे सिंह यांनी म्हटले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.