गणपती विसर्जनादरम्यान सहा तरुणांचा बुडून मृत्यू

शहादा तालुक्‍यातील वडछील गावातील दुर्घट

नंदुरबार – नंदुरबार जिल्ह्यात गणपती विसर्जनादरम्यान दुर्दैवी घटना घडली आहे. पाच दिवसाच्या गणपती विसर्जनासाठी गेलेल्या सहा तरुणांचा तलावात बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना शहादा तालुक्‍यातील वडछील गावात घडली. या दुर्दैवी घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
कैलास संजय चित्रकथे, सचिन सुरेश चित्रकथे, रविंद्र शंकर चित्रकथे, विशाल मंगल चित्रकथे, दीपक सुरेश चित्रकथे, सागर आप्पा चित्रकथे अशी मृतांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणपती विसर्जनासाठी हे सहा तरुण कमरावद येथील तलावात उतरले होते. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडाले. त्यांच्यासोबत असलेल्या तरुणांनाही पोहता येत नसल्याने त्यांनी आरडाओरडा सुरु केला.

त्यावेळी आवाज ऐकूण स्थानिकांनी या तरुणांना वाचवण्याचे प्रयत्न केले. मात्र तोपर्यंत या सर्वांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, बचाव पथकाला या सहाही तरुणांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहेत.म्हसावाद ग्रामीण रुग्णालयात त्यांचे मृतदेह पाठवण्यात आले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.