भरुच – गुजरातमधील भरुचमध्ये एका रासायनिक कंपनीत मोठा स्फोट झाला असून या भीषण स्फोटात सहा कामगारांचा मृत्यू झाला आहे. या भयंकर स्फोटामुळे आजुबाजूच्या परिसर हादरला आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले व बजाव कार्य सुरु केले. या स्फोटाचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. ही घटना दहेज औद्योगिक परिसरात घडली आहे.
Six workers killed in blast at chemical factory in Gujarat's Bharuch district: Police
— Press Trust of India (@PTI_News) April 11, 2022
भरुच येथील रासायनिक कंपनीत आज पहाटे ३ वाजताच्या सुमारास स्फोट झाला. या स्फोटाचा आवाज दूरपर्यंत ऐकू आला. यामध्ये 6 कामगारांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना दहेज औद्योगिक परिसरात ही घटना घडली आहे. स्फोटामुळे घटनास्थळी एकच गोंधळ उडाला आहे.
या घटनेबाबत एसपी लीना पाटील यांनी माहिती देताना सांगितले की, जेव्हा प्लांटचा स्फोट झाला तेव्हा रिअॅक्टरजवळ 6 लोक काम करत होते. डिस्टिलेशन प्रक्रियेदरम्यान स्फोट झाला. स्फोटामुळे आग लागली, त्यात 6 जणांचा जळून मृत्यू झाला. मृतांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून ते शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. कारखान्यातील आग विझवण्यात आली आहे. या अपघातात अन्य कोणीही जखमी झालेले नाही. पुढील तपास पोलीस करत आहेत.