सातारा – जिल्ह्यात सहा करोनाबाधितांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. त्यामध्ये सातारा शहर, लोणंद, फलटण, बावधन (ता. वाई), पांढरवाडी (ता. माण) येथील महिला व अतीत येथील एका पुरुषाचा समावेश आहे. जिल्ह्यात करोनाबळींची एकूण संख्या 180 झाली आहे. दरम्यान, रविवारी (दि. 9) रात्री जाहीर करण्यात आलेल्या अहवालांनुसार आणखी 115 जणांना करोनाची बाधा झाली आहे.
सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात दाखल असलेली साताऱ्यातील पोलीस वसाहतीतील 68 वर्षीय महिला, माळी आळी (लोणंद, ता. खंडाळा) येथील 60 वर्षीय महिला, अतीत, ता. सातारा येथील 49 वर्षीय पुरुष, कोळकी (फलटण) येथील 75 वर्षीय महिला, सातारा येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल असलेली पांढरवाडी (जाधववाडी), ता. माण येथील 72 वर्षीय महिला, वाईतील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल असलेली बावधन,
ता. वाई येथील 80 वर्षीय महिला, अशा सहा करोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती डॉ. गडीकर यांनी दिली. पाटण तालुक्यातील निसरे येथील एक युवक, कराड तालुक्यातील काले येथील एक पुरुष, ओंढ येथील एक पुरुष, एक महिला, गोटे (मुंढे) येथील एक पुरुष, मलकापुरातील एक पुरुष, विरवडे येथील महिला, चोरे येथील सहा महिला, 12 वर्षांची मुलगी, धावरवाडीतील दोन महिला, एक पुरुष, कराड शहरातील एक महिला, सातारा तालुक्यातील संगमनगर (सातारा) येथील दोन पुरुष, सातारा शहरातील दहा पुरुष, एक महिला,
कोंडवे येथील एक महिला, अतीत येथील दोन पुरुष, जकातवाडीतील महिला, शेंद्रे येथील महिला, बारावकरनगर येथील एक महिला, पाटखळ येथील महिला, सासपडेतील युवक, विकासनगर येथील एक पुरुष, खेडमधील युवक, शाहूपुरीतील एक महिला, 15 वर्षे वयाच्या दोन मुली, 9 वर्षांचा मुलगा, एक पुरुष, खटाव तालुक्यातील वडूज येथील दोन पुरुष, मायणीतील आठ वर्षांची मुलगी, चार महिला, दोन पुरुष, पुसेगावमधील एक वर्षीय पुरुष, एनकूळ येथील युवक,
कोरेगाव तालुक्यातील, आसनगावातील महिला, कोरेगावमधील एक पुरुष, वाई तालुक्यातील चिंधवलीतील एक पुरुष, वाई शहरातील एक महिला, एक पुरुष, चाहूर येथील दोन पुरुष, खानापूरमधील एक पुरुष, परखंदीतील दोन महिला, भोगावमधील एक पुरुष, माण तालुक्यातील पांढरवाडी (जाधववाडी) येथील चार पुरुष,
दोन महिला, 15, 12, 8 वर्षे वयाच्या मुली, 3 वर्षांचे बालक, शिवरीतील एक पुरुष, खंडाळा तालुक्यातील मोह तर्फ शिरवळ येथील युवक, लोणंद येथील दोन वृद्ध महिला, पडवळवाडीतील एक महिला, जावळी तालुक्यातील कुडाळमधील एक वृद्ध, रांगेघर येथील एक महिला, एक पुरुष, कुडाळमधील एक पुरुष, फलटण तालुक्यातील विडणी येथील एक पुरुष,
11, 13, 15 वर्षे वयाची मुले, 14 वर्षांची मुलगी, तीन महिला, गुणवरेतील तीन पुरुष, गिरवीतील तीन महिला, 12 वर्षांची मुलगी, 10 वर्षांचा मुलगा, एक पुरुष, तडवळे येथील चार महिला, एक युवक, 11 व 9 वर्षे वयाची मुले, फलटण शहरातील एक पुरुष, कोल्हापूर येथील शिवाजी पेठेतील एक पुरुष, अहमदनगर येथील युवक यांचा नव्याने आढळलेल्या बाधितांचा समावेश आहे.