किमान सहा हजार रुपये पेन्शन मिळावी

पेन्शनर संघटनेचे उद्धव ठाकरेंना निवेदन

नगर – ई पी एस -95 च्या पेन्शन धारकांना किमान सहा हजार रुपये निवृती वेतन मिळावे. कामगारांना किमान 9 हजार रुपये पेन्शन मिळावी. अशा मागणीचे निवेदन शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्र राज्य पेन्शनर्स संघटनेच्या वतीने देण्यात आले. या वेळीसंघटनेचे अध्यक्षगोरख कापसे, सरचिटणीस सुभाष कुलकर्णी, उपाध्यक्ष बाबुराव दळवी, अंकुश पवार, शेटे आदी उपस्थित होते.

ईपी एस 95 या पेन्शन योजने अंतर्गत देशातील 186 उद्योगांचा समावेश असून यातून सेवानिवृत्त होणाऱ्या कामगारांना या पेन्शन योजनेतून निवृत्ती वेतन दिले जाते.देशात सध्या या योजनेचा लाभ 63 लाख नागरिकांना मिळत आहे तर राज्यातील 13 लाख नगरिक या योजनेचा लाभ घेत आहेत त्यांना 500 रुपयांपासून 2500 रुपये पेन्शन मिळते ती यापुढील काळात कोशियारी समितीच्या शिफारसी प्रमाणे मिळावी अशी या संघटनेची प्रमुख मागणी आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.