शिवशाहीसह ६ खासगी बसेस आगीत भस्मसात

पुणे – महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या शिवशाहीसह ६ खासगी बसेस आगीत जाळून खाक. पुणे शहरात कात्रज भागातील शिंदेवाडीत असणाऱ्या गॅरेजमध्ये ही घटना घडली असून आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेऊन आग विझविली. अग्निशामक दलाने दिलेल्या माहितीनुसार या गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी २ शिवशाही आणि ४ खासगी बसेस उभ्या होत्या. आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून आगीचे कारण अद्याप कळू शकले नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.