बुर्किना फासोत चर्चवर हल्ल्यात धर्मगुरुसह 6 जण ठार

ओआगादोगुवा (बुर्किना फासो) – बुर्किना फासोच्या उत्तरेकडील एका गावामध्ये एका चर्चवर झालेल्या हल्ल्यामध्ये धर्मगुरुसह एकूण 6 जण ठार झाले आहेत. हा हल्ला रविवारी सकाळी प्रार्थना संपल्यानंतर झाला. हल्ला झालेले सिल्गादजी हे गाव मालीच्या सीमेपासून अगदी जवळ आहे. मोटरसायकलवरून आलेल्या हल्लेखोरांनी प्रथम हवेत गोळीबार केला आणि नंतर चर्चमधून बाहेर पडणाऱ्या नागरिकांवर गोळ्या झाडल्या. या हल्ल्यानंतर किमान दोघेजण बेपत्ता असून 6 जण मरण पावल्याची माहिती सहेज भागातील अधिकाऱ्यांनी दिली. बुर्किना फासोमध्ये जिहादी गटांकडून सातत्याने अस्थिरता निर्माण केली जात असते. अशा घातपाती कारवाया करणारे अनेक गट देशामध्ये सक्रिय आहेत. पण आतापर्यंत कोणत्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.
एका अन्य घटनेमध्ये बुर्किना फासोच्या पूर्वेकडील भागात शुक्रवारी 5 शिक्षकांना गोळ्या घालून मारण्यात आले. इस्लामी कट्टरवादी गटांकडून या वर्षाच्या प्रारंभी विदेशी पर्यटकांचे अपहरण आणि कॅनडाच्या भूगर्भशास्त्रज्ञाची हत्या केली गेली होती.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.